Chandani Chauk Bridge Demolished : पुण्यातील चांदणी चौक पुल इतिहासजमा

पुणे शहरातील महत्वाचा पुल म्हणून ओळखला जाणारा पुणे-बंगळूर महामार्गावरील चांदणी चौक पुल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पाडण्यात आला. हा पुल अवघ्या 6 सेकंदात जमीनदोस्त करण्यात आला.;

Update: 2022-10-02 04:22 GMT

पुणे शहरातील वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने अखेर पुण्यातील चांदणी चौक पुल पाडण्यात आला. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे-बंगळूर महामार्गावरील चांदणी चौक पुल पाडणार-पाडणार अशी चर्चा रंगली होती. मात्र अखेर हा पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पाडण्यात आला. मात्र पहिल्या झटक्यात न पडल्याने या पुलाचे उर्वरित पाडकाम पोकलेनने सुरू आहे. तसेच पाडलेल्या पुलाचा राडा उचलण्याचे काम पुर्ण होईपर्यंत या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच हा पुल पाडण्यापुर्वी या भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मध्यरात्री हा पुल पाडण्यात आला. यावेळी हा पुल पाडण्यासाठी 600 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. मात्र या स्फोटकांनी अवघ्या 6 सेकंदात पुल पाडण्यात आला. मात्र या स्फोटकांच्या वापरानंतरही पुलाचा काही भाग पडला नव्हता. त्यामुळे हा भाग पाडण्यासाठी पोकलेनचा वापर करण्यात येत आहे. मात्र सकाळी 8 पर्यंत हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिऱ्यांनी सांगितले होते. मात्र स्फोटकांच्या वापरानंतरही पुर्ण पुल न पडल्याने वाहतूक खेड-शिवापूर टोलनाका आणि वाकड-शिवापूर मार्गाने वळवण्यात आली आहे. या मार्गावर तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कधी बांधण्यात आला होता चांदणी चौक पुल?

1995 मध्ये पुणे-बंगळूर महामार्गावर चांदणी चौक पुल बांधण्यात आला होता. 

Tags:    

Similar News