सरदार पटेल स्टेडीयमचे नामांतर नरेंद्र मोदी स्टेडीयम करण्याबरोबरच कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या छायाचित्रावरुन वाद सुरु असताना आता मोदींचे छायाचित्र आणि भगवदगीतेची प्रत घेऊन खाजगी क्षेत्रातला पहीलाच `सतीश धवन उपग्रहानं अंतराळाकडे उड्डाण केलं आहे.
हिंदुचा धर्मग्रंथ असलेली भगवदगीता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावासहीत फोटो आणि इतर २५ हजार जणांची नावं घेऊन भारतातून एक सॅटेलाईट अंतराळात पाठवण्यात येणार आहे. या नॅनो सॅटेलाईटचं नाव भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला दिशा देणारे शास्त्रज्ञ सतीश धवन यांच्या नावावरून देण्यात आलं आहे.
हा उपग्रह 'स्पेसकिड्स इंडिया'द्वारे विकसीत करण्यात येतोय. विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ही एक संस्था आहे. महान वैज्ञानिक सतीश धवन यांच्याद्वारे ही संस्था उभारण्यात आली होती. हा उपग्रह आपल्यासोबत तीन इतर पेलोडस् घेऊन जाणार आहे.
इस्रो'च्या (Indian Space Research Organisation) मदतीनं खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह आपल्या प्रवासाला निघाला. हा उपग्रह ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन 'पीएसएलव्ही-सी ५१'च्या माध्यमातून इतर दोन खासगी उपग्रहांसहीत हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. यात ब्राझीलच्या 'अमेझोनिया-१' या उपग्रहाचाही समावेश आहे. चेन्नईपासून १०० किलोमीटर दूर श्रीहरिकोटा स्पेस सेंटरमध्ये आज सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला आहे.
'सतीश धवन उपग्रह' किंवा 'एसडी सॅट' या सॅटेलाईटसोबत २५,००० हजार व्यक्तींची नावंही अवकाशात पाठवली आहेत. ही नॅनो सॅटेलाईट 'पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल'द्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे.