हायस्पीड बुलेट ट्रेनला अमरावतीत थांबा द्या ; वंचित बहुजन आघाडीची मागणी
अमरावती जिल्ह्यातून समृद्धी महामार्गालगत आता बुलेट ट्रेन धावणार आहे,त्याचं नियोजन सुरू आहे,या बुलेट ट्रेनला अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे याचा थांबा द्यावा अशी मागणी होत आहे.;
अमरावती : अमरावती जिल्ह्यातून समृद्धी महामार्गालगत आता बुलेट ट्रेन धावणार आहे,त्याचं नियोजन सुरू आहे,मात्र राज्याची उपराजधानी नागपूर ते मुंबई पर्यंत धावणाऱ्या या बुलेट ट्रेनचा थांबा अमरावती जिल्ह्यात नाही. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे याचा थांबा द्यावा व स्टेशनला स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच नाव द्या अशी मागणी आज वंचित बहूजन आघाडीने केली आहे.
वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दिले आहे. या निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारने पाठपुरावा करून अमरावतीत या बुलेट ट्रेनचा थांबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वास्तविक समृद्धी मागमार्ग आणि बुलेट ट्रेनसाठी येथील स्थानिक शेकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, शिवाय मुंबई पुण्याकडे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुलगाव किंवा कारंजा येथून या सुविधांचा लाभ घ्यावा लागणार आहे त्यामुळे या ट्रेनला अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे थांबा द्यावा अशी मागणी होत आहे.