प्रकल्पग्रस्तांनी "सोलर' कंपनीवर चढवला हल्ला!
सोलर कंपनीवर कारवाई करण्याबाबत "अल्टिमेटम' देऊनही याबाबत कार्यवाही न झाल्यामुळे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांनी थेट सोलर प्रकल्पावर हल्ला चढवत शेकडो सौर ऊर्जेच्या प्लेट फोडून आक्रोश व्यक्त केला. यातून लाखोंचा नुकसान कंपनीला झाला आहे.
सोलर कंपनीवर कारवाई करण्याबाबत "अल्टिमेटम' देऊनही याबाबत कार्यवाही न झाल्यामुळे सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांनी थेट सोलर प्रकल्पावर हल्ला चढवत शेकडो सौर ऊर्जेच्या प्लेट फोडून आक्रोश व्यक्त केला. यातून लाखोंचा नुकसान कंपनीला झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील बोढरे - शिवापूर शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी अवाजवी दराने खरेदी करून सोलार कंपनीने शेतकऱ्यांवर अक्षरशः अन्याय केल्याच्या आरोप करत व जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या चार वर्षांपासून पिडीत शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीकडून लढा सुरू आहेत. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीने अनेक वेळा मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन केली.
परंतु यापैकी २१ सप्टेंबर-२०२१ रोजी पासून सुरु झालेला बेमुदत धरणे आंदोलन यशस्वी ठरले होते. कारण हे आंदोलन तब्बल अठरा दिवस भरपावसात सुरु असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष हे पीडित शेतकऱ्यांकडे लागले होते. त्यात चौकशीचे लेखी आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन तूर्तास स्थगिती देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आशेची किरण गवसली होती. या आंदोलनाला एक वर्षे पूर्ण होत आले आहे. तरीही शेतकरी अद्याप न्यायापासून वंचित आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी बुधवार (ता. २१) चाळीसगाव गाठून तहसीलदार अमोल मोरे, यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले होते कि, शासनाला जे काही चौकशी अहवाल सादर करण्यात आले आहे. त्यावर तात्काळ सुनावणी घेऊन सोलर प्रकल्पावर कारवाई न झाल्यास येत्या ७ आक्टोंबर-२०२२ पासून प्रकल्पासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मात्र दिलेल्या अहवानानुसार कुठलीही कारवाई झाली नाही. म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी सोलर प्रकल्प गाठून शुक्रवार (ता. ७) रोजी पासून बेमुदत आंदोनला सुरुवात केली. मात्र चार दिवस उजाडला तरीही कोणीही दखल घेतली नाही. म्हणून आक्रमक पवित्रा घेत पिडीतांनी सोलर प्रकल्पावर हल्ला चढवून शेकडो सौर ऊर्जेच्या प्लेट फोडल्या आहे. लाखो रुपयांचा नुकसान दोन्ही कंपन्यांना झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यामुळे हि सर्व परिस्थिती आटोक्यात आणली. व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.