सिडकोने नवी मुंबई हे देशातील एक सुनियोजित शहर म्हणून विकसित केले. हे शहर विकसित करीत असताना नवी मुंबई आणि परिसरातील झोपड़पट्टी, शेतकरी आणि गावातील लोकांची घरे, जमिनी, गोठे, मच्छीमारीची ठिकाणे ताब्यात घेतली. मात्र त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन न करता त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. याविरोधात नवी मुंबई , पनवेल परिसरातील 95 गावातील निवासी हे सिडकोच्या स्थापना दिनी सिडको निषेध दिन पाळणार असूम, सिडको हटाव ही त्यांची मागणी आहे.