''राज्य सरकारमध्ये मंत्री नसल्याने..'' पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारचे कान टोचले...

Update: 2023-01-10 09:38 GMT

 भारत जोडो यात्रेनंतर हात से हात जोडो अभियान आम्हीं राज्यभरात राबविणार आहे, त्यासाठी माजी मंत्री पल्लम राजू हे निरीक्षक म्हणून येणार आहे, कार्यकारणीच्या बैठका नेहमी मुंबईला होतात मात्र नागपूरात बैठक होत आहे ही चांगली गोष्ट असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल आहे.

भारत जोडो यात्रा संपल्यावर 26 जानेवारीपासून 'हात से हात जोडो अभियान' राबविणार आहे, दोन महिने हा अभियान राज्यात राबवले जाणार आहे. त्याची रूपरेषा ठरवण्यासाठी एक मोठी बैठक राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, स्थानीक पातळीवर होणार आहे. या नंतर प्रतेक गावात आम्हीं पदयात्रा काढणार आहे, प्रतेक घरात जाऊन राहून गांधी यांचं अपील प्रतेक घरात जाऊन नागरिकास करणारं, इतकाच नाही तर मोदी सरकारच्या विरोधात आरोपपत्र आणि भारत जोडो यात्रेचे स्टिकर आम्ही प्रतेक घरात लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचा अनोखा अभियान राबवणार असल्याचं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे...

शिंदे- फडणवीस सरकारवर केली टीका..

सरकारवर टांगती तलवार असल्यानं विस्तार होत नाही, एकदा जे काही आहे ते निश्चित करा. राज्य सरकारमध्ये मंत्री नसल्याने कारभारावर परिणाम होतो आहे. कोर्टाने काय आहे ते आजच निर्णय द्यावा, 10 परिशिष्टाचा उल्लंघन झाल असल्याने 16 आमदाराचा निलंबन व्हायला पाहिजे, सरकार राहो अथवा जावो निर्णय या बाजूने लागेल की त्या बाजूने लागो, आज निर्णय व्हायला पाहिजे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली होती...


Full View

Tags:    

Similar News