नीरज चोप्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून केले कौतुक

देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याचे संपुर्ण देशभरातुन कौतुक होत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नीरजला फोन करून शुभेच्छा दिल्यात

Update: 2021-08-08 03:15 GMT

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याचं संपुर्ण देशभरातुन कौतुक होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नीरज चोप्राला शुभेच्छा देत नीरजला फोन केला आहे.

"ऑलिम्पिक समारोपाच्या दिशाने जात असताना तू देशाला खूश केलं" असं पंतप्रधान मोदींनी नीरजला म्हटलं आहे. तर "भारतासाठी मला काहीतरी करायचं होतं. मला सर्व भारतीयांचा पाठिंबा होता. मला सुवर्ण जिंकायचं होतं. तुम्ही देखील स्पर्धा बघत होता म्हणून खूप चांगलं वाटत आहे" असं नीरजने पंतप्रधान मोदींना म्हटलं आहे.

ऑलिम्पिक एक वर्ष उशिरा झाल्याने जास्त मेहनत घ्यावी लागली असेल. दुखापत झाली असतानाही देखील तू उत्तम कामगिरी केलीस. असं म्हणत मोदींनी नीरजचं कौतुक केलं. तुझ्यामुळे इतर तरूणांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा मिळेल, असंही मोदींनी नीरजला म्हटलं आहे.

दरम्यान, तुझ्या आई-वडिलांना माझ्याकडून नमस्कार सांग असं म्हणत येत्या 15 ऑगस्टला आपण भेटत आहोत, असं मोदींनी नीरजला सांगितलं.

Tags:    

Similar News