पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या केदारनाथला भेट देणार ; विविध विकासकामांचे उद्घाटन करणार

Update: 2021-11-04 00:58 GMT

नवी दिल्ली// पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या उद्या केदारनाथ धामच्या यात्रेवर जाणार आहेत. केदारनाथ धाम येथे पूजा केल्यानंतर ते श्री शंकराचार्य समाधीचे तसेच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. याबरोबरच ते वेगवेगळ्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या केदारनाथ यात्रेशी संत, महंत जोडले जाणार आहेत तर पंतप्रधान मोदी यांच्या केदारनाथ धाम भेटीच्या कार्यक्रमात देशभरातील भाजप वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी तसेच मंत्री सामील होणार आहेत. तसेच देशातील सर्व ज्योतिर्लिंग, चार धाम तसे प्रमुख शिवायलय मंदिरातील संतदेखील मोदी यांच्या केदारनाथ धाम यात्रेशी जोडले जाणार आहेत.

देशाचा सांस्कृतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी आणि देशवासीयांना त्याची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच या कार्यक्रमात देशभरातील प्रमुख 87 मंदिरांमधील संत, महामंडलेश्वर, आचार्य देखील सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या केदारनाथ धाम यात्रेदरम्यान संत मेळावे आणि देशाच्या अध्यात्मिक चैतन्याला नवा आयाम देणारे कार्यक्रम असणार आहेत.

दरम्यान, 2013 साली केदारनाथ येथ भीषण पूर आला होता, या महापुरात श्री केदारनाथ धामची मोठी हानी झाली. त्यानंतर या पवित्र स्थळाच्या संपूर्ण पुनर्बांधणीचे काम नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यानंतर आता मोदी केदारनाथ यात्रेला 5 नोव्हेंबर रोजी रवाना होणार आहेत.

Tags:    

Similar News