खळबळजक : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी संजय राऊतांवर दबाव

राज्यातील महाविकास आघाडीच्या निर्मितीमधे महत्वाची भुमिका असलेलं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकार पाडून मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी माझ्यावर दबाव असल्याचा खळबळजक आरोप केला आहे.;

Update: 2022-02-09 03:44 GMT

राज्यातील महाविकास आघाडीच्या निर्मितीमधे महत्वाची भुमिका असलेलं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकार पाडून मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी माझ्यावर दबाव असल्याचा खळबळजक आरोप केला आहे.

``सत्यमेव जयते`` असं म्हणत खा. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना लिहलेलं पत्र ट्विट केलं आहे. विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा केला आहे. नुकतेच संजय राऊत यांच्या निकटवर्तींना ईडीकडून अटक करण्यात आलं आहे. तसंच काल दिल्लीमधे पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीच्या वतीनं फक्त मीच का बोलायचं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला होता.

संजय राऊत यांच्या अस्वस्थतेचं कारण आता उघड झालं आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे.यामध्ये त्यांनी मध्यावर्ती निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती असाही गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान यामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकावलं जात आहे जेणेकरुन आपण राज्यसभेत मोकळेपणाने बोलू नये, असाही आरोप त्यांनी केला आहे. 

संजय राऊत यांनी , राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात असेही राऊत यांनी म्हटले. 

संजय राऊत यांनी आरोप केला आहे की, अंमलबजावणी संचालनालय (ED) त्यांच्या मुलीच्या लग्नात सहभागी असलेल्या विक्रेत्यांना त्रास देत आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीने त्यांचे कुटुंब, मित्र आणि त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी डेकोरेशनचे काम करणाऱ्या लोकांना ईडीने जबरदस्तीने बोलावल्याचा आरोप करत कामाच्या मोबदल्यात संजय राऊत यांच्याकडून 50 लाखांची रोकड घेतली आहे. तसेच त्यांनी दिले होते, असे वदवून घेण्याचा प्रकार दिसून येत आहे. जेणेकरुन संजय राऊत यांना पीएमएलए प्रकरणात अडकवता येईल, असे या पत्रात म्हटले आहे.

Full View

Tags:    

Similar News