Alt Newsचे मोहम्मद झुबेर यांच्या अटकेचा निषेध
Alt Newsचे सहसंपादक मोहम्मद झुबेर यांच्या अटकेचा प्रेस क्लब ऑफ इंडियाने निषेध केला आहे.;
देशातील माध्यमांवर सरकारी यंत्रणांचा दबाव वाढत असल्याचं दिवसेंदिवस घडणाऱ्या अनेक घटनांमधून दिसून येत आहे. यामुळं माध्यमांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. अलिकडेच नुपूर शर्मा या भाजपच्या महिला प्रवक्त्याचा खरा चेहरा समोर आणणाऱ्या अल्ट न्यूजचे पत्रकार मोहम्मद झुबेर यांना २०१८ च्या एका ट्वीटसाठी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या अटकेविरोधात दिल्लीच्या प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. व्यवस्थेच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या पत्रकारांना, वृत्तसंस्थांना टार्गेट केलं जात असल्याचं मत द वायरचे संपादक सिद्धार्थ वरदराजन, प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमाकांत लखेरा, शोभा जैन, ज्येष्ठ पत्रकार टी एन निनाण यांनी व्यक्त केलं आहे.