द वायर वरील FIR चा प्रेस क्लब ऑफ इंडिया कडून धिक्कार
सामाजिक शांततेचा भंग केल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरवर तसंच काही द वायरच्या पत्रकारांवर गुन्हे दाखल केल्याचा प्रेस क्लब ऑफ इंडिया कडून धिक्कार करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.;
एका मुस्लिम वयोवृद्धावर 5 जून रोजी झालेल्या हल्ल्याबाबत ही कारवाई करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात ट्वीटर, ट्वीटर कम्युनिकेशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ऑल्ट न्यूजचे संस्थापक मोहम्मद झुबैर, पत्रकार राणा आयुब, वेबसाईट द वायर, पत्रकार सबा नकवी, काँग्रेस नेता मस्कूर उस्मानी, सलमान निजामी, डॉ. शमा मोहम्मद यांचा समावेश आहे.
एडिट केलेला व्हीडिओ व्हायरल केल्याच्या आरोपावरून हा गिने ही दाखल करण्यात आला आहे. या व्हीडिओत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केलं असल्याचं चित्रण आहे.
विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सोशल मीडिया गाईडलाईन्सचा वापर होतोय का? अशा प्रश्नात प्रेस क्लब ऑफ इंडियाने उपस्थित केला असून हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचेही म्हटले आहे.
पोलिसांनी भारतीय दंड संहिता 153, 153अ, 295अ, 505, 120ब, 34अ अंतर्गत या सर्वांविरोधात तक्रार दाखल केला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संबंधित लोकांनी घटनेची सत्यासत्यता न तपासता घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. समाजातील शांतता भंग करण्याचा आणि धार्मिक समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नातून हा व्हीडिओ प्रसारित करण्यात आला.हा व्हीडिओ व्हायरल करण्यामागच्या षडयंत्राचा पोलीस तपास करत आहेत. प्रसद क्लब ऑफ इंडियाने याबाबत उत्तर प्रदेश सरकार FIR मागे घेण्याची मागणी केली आहे.