राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज दुपारी किल्ले रायगडावर ; परिसरात मोठा बंदोबस्त तैनात

Update: 2021-12-06 02:41 GMT

रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज दुपारी सव्वा बारा वाजता किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. राष्ट्रपती कोविंद येणार असल्याने रायगड किल्यासह पंधरा ते वीस किलोमीटर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

दरम्यान किल्ले रायगडावर राजसदर, होळीचा माळरान, जगदीश्वर मंदिरावर सुंदर अशी फुलांची आकर्षित सजावट करण्यात आली आहे. तसेच विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री, नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान केवळ अधिस्वीकृती धारक पत्रकारांनाच गडावर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेले तीन दिवस जिल्हा प्रशासन हे राष्ट्रपती यांच्या दौऱ्याचे नियोजन करत आहेत.

सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलिकॉप्टर थेट गडावर उतरणार होते, मात्र शिवप्रेमींनी त्याला विरोध केल्याने शिवप्रेमींच्या भावनेचा आदर करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रोप- वे ने गडावर जाणार असल्याचे सांगितले. त्याबद्दल शिवप्रेमींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आभार मानले.

Tags:    

Similar News