'तौक्ते' चक्रीवादळात वेळीच दक्षता घेतल्याने बीकेसी जंबो कोविड सेंटरमधील रुग्ण सुरक्षित
तीन दिवसापूर्वी पूर्व सूचना मिळाल्या बरोबरच शेकडो कोविड रुग्णांना रातोरात रुग्णालयांमध्ये हलवून कोणतीही गैरव्यवस्थापन आणि अपघात टाळण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे.;
शनिवार,15 मे 2021 रोजी मुंबई महानगर प्राधिकरण (MCGM )च्या सूचना BKC जंबो कोविड सेंटरचे डीन डॉ.राजेश डेरे यांना प्राप्त झाल्याबरोबर लगेच BKC जंबो कोविड सेंटर च्या बाहेरील प्रतीक्षा कक्षाचा मंडप डॉ. डेरे यांनी खबरदारी म्हणून वादळाच्या आधीच काढून ठेवला होता.
दाणादाण होऊ नये म्हणून डॉ.राजेश डेरे सर व संपूर्ण टीम गेली 3 दिवस रात्रंदिवस स्वतः हजर राहून सगळी काळजी घेत आहेत, ज्यात रूग्णांना वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्याच्या योग्य उपचाराची व्यवस्था पासून ते वादळापासून बचाव करण्यासाठी बाहेरील साधा मंडप काढून ठेवणं असो हे सगळं वादळाआधीच व्यवस्था केली होती.
किरकोळ पाऊस आणि थोडा वारा यामुळे कुठले ही मोठे नुकसान झाले नाही, सर्व काही जैसे थे आहे. खबरदारी म्हणून लसीकरण केंद्रा बाहेरील प्रतीक्षा कक्षाचा मंडप आपण आधीच काढून ठेवला होता, त्यामुळे त्याचेही नुकसान आपण होऊ दिली नाही. लवकरच तो पुन्हा उभारला जाईल.
MMRDA ने विकसित केलेलं बीकेसी जंबो कोविड सेंटर, 3 जून 2020 ला आलेल्या अगदी भीषण NISARG चक्रीवादळाच्या वेळीही खंबीरपणे उभ राहिलं आणि वादळाला परतवून लावलं होतं. त्यावेळीही बीकेसी कुठलेही नुकसान न होऊ देता उभं राहिल आणि त्या निसर्ग चक्रीवादळा नंतर अवघ्या 3 दिवसांच्या आत रुग्णसेवेची नवीन सेवा पुन्हा सुरू केली.
याहीवेळी "तौक्ते" वादळात ही बीकेसी जंबो कोविड सेंटर दृढपणे उभे राहील आणि एमसीजीएमच्या सूचनेनुसार लवकरात लवकर रुग्ण सेवा सुरू करेल असा आम्हाला विश्वास आहे, असे डॉ. डेरे यांनी म्हटले आहे.
काही वर्तमानपत्रांनी तौक्ते चक्रीवादळात बीकेसी कोविड सेंटरची दाणादाण अशा बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या या बातम्या वस्तुस्थितीचा विपर्यास करणाऱ्या असून यापुढे आमच्याशी संपर्क करून माहितीची खातरजमा करून मग बातमी छापवी जेणेकरून नागरिकांचा गोंधळ होणार नाही.
कारण माध्यमांनी केलेली चूकीचे वार्तांकन आणि पसरवलेल्या अफवा खूप मोठे संकट ओढावू शकते, असे बीकेसी कोविड सेंटर कडून स्पष्ट करण्यात आले आहे.