आज येईल उद्या येईल. असं म्हणत ज्या लसीची आपण वाट पाहात आहात. ती लस अखेर आली आहे. आज पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटट ऑफ इंडियामधून पहाटेच ही लस देशातील विविध भागात पाठवण्यात आली. कोव्हिड-19 लसीचा हा पहिला टप्पा आहे.
पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना ही लस देण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या पहिल्या टप्प्यात कोरोनाविरोधी लढ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 16 जानेवारीपासून लस देण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे.
आज पहाटे 12 जानेवारील पुण्याच्या सिरम इंन्स्टिट्युटमधून पुणे एअरपोर्टकडे ही लस रवाना करण्यात आली. त्यानंतर ही लस विविध राज्यात पाठवण्यात येणार आहे. या लसीचं नाव 'कोव्हिशिल्ड' असं आहे.