महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे : प्रवीण दरेकर

सरकारच्या भावना ओबीसींना आरक्षण देण्याच्या नाहीत. याचे कारण न्यायालयाने चार चार वेळा नोटिसा पाठवूनही त्याचे उत्तर सरकारला देता आले नाही अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली;

Update: 2021-12-20 03:18 GMT

रायगड (धम्मशील सावंत) // महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. या सरकारला संवेदनाच नाहीत. अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाली रायगड येथे मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की,लखिमपूरच्या शेतकऱ्याचे जे झाले ते चुकीचेच आहे. त्याचा आम्ही निषेध करतो त्यासाठी हे गळा काढतात, केबिनेट मध्येच श्रध्दांजली वाहतात आणि या आपल्याच मातीतले एसटी चे 22 कर्मचारी आत्महत्या करतात, मृत्युमुखी पडतात. तेव्हा एकाच्या तरी डोळ्यात अश्रू आले का ? हे अश्रू ढाळायचे सोडा याउलट तुमच्यावर मेस्मा लावतो, तुमचे निलंबन करतो, तुमच्यावर कारवाई करतो अशा प्रकारे या कर्मचाऱ्यांना दाबण्याचे त्यांचा संप चिरडण्याचे काम हे सरकार करीत आहे. त्यामुळे सरकारने हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता त्यांच्या विलीनीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा नाहीतर सरकारला याची किंमत मोजावी लागेल.

सरकारच्या भावना ओबीसींना आरक्षण न देण्याच्या आहेत. याचे कारण न्यायालयाने चार चार वेळा नोटिसा पाठवूनही त्याचे उत्तर सरकारला देता आले नाही. जे सुप्रीम कोर्टाला अभिप्रेत आहे तशा प्रकारचा अध्यादेश या सरकारने काढला नाही आणि इम्पेरिकल डेटा केंद्र सरकार देत नाही म्हणून उलट्या बोंबा हे सरकार मारीत होते. परंतू सुप्रीम कोर्टाने सांगितले की, इम्परिकल डेटा गोळा करण्याचे काम केंद्र सरकारचे नसून राज्य सरकारचे आहे. ओबीसींचा इम्परिकल डेटा गोळा करायचे नाही आणि अध्यादेश काढायचे. मागासवर्गीय आयोग गठित करणे, इम्परिकल डेटा गोळा करणे, Tripal टेस्ट करणे जरुरीचे आहे त्याच्याशिवाय ओबीसींना आरक्षण देता येणार नाही.

९ महिने गेले या सरकारला इम्परिकल डेटा गोळा करता आला नाही, Tripal टेस्ट न करता मागासवर्गीय आयोग गठित करता आले नाही. त्यामुळे हे महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळ फेक करीत आहे. या सरकारचे पितळ उघड झाले.

रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जात आहे,अनेक ठिकाणी राष्ट्रवादी , काँग्रेस , शिवसेना व इतर विरुद्ध भाजप अशी लढत आहे.

हे आव्हान आमच्यासाठी नगण्य आहे. याचे कारण सर्व ठिकाणी ते एकमेकांना मिठ्या मारून आघाड्या करत आहे. काही ठिकाणी वेगळे झाले. चारही ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे लढत आहे. यावरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर लक्षात येईल. याचे कारण हे सरकार सत्तेसाठी एकत्र आहेत आणि नगरपालिकेमध्ये एकमेकांचे पाय ओढत आहेत. लोकांना खरी वस्तुस्थिती कळते. यांचे जे काही चालले आहे ते सत्तेसाठी चालले आहे असं दरेकर म्हणाले.

तर , आमचा पक्ष हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे विचार जनतेमध्ये पोहोचविण्याचे काम करीत असून जनमाणसामध्ये पक्षाची आणि नेत्यांची प्रतिमा आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचा काळ असेल, वादळाचे संकट असेल अशा वेळी लोकांमध्ये जाऊन लोकांना आधार देण्याचे काम केले. त्यावेळी यांचे नेते घरात होते, यांचे सरकार घरात होते तर आमचे कार्यकर्ते रस्त्यावर होते. लोकांना मदत करत होते याची जाणीव ठीकठिकाणी लोकांना आहे.

Tags:    

Similar News