चंद्रयान-३ वर एक ट्वीट आणि अभिनेते प्रकाश राज झाले ट्रोल

Update: 2023-08-21 15:07 GMT

अभिनेते प्रकाश राज यांनी चंद्रयान-३ वर एक ट्वीट केले होते. मात्र त्यावरून प्रकाश राज यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे.

अभिनेते प्रकाश राज यांनी एका चहावाल्याचा फोटो ट्वीट केला आहे. त्यावर ब्रेकिंग न्यूज, चंद्रावरून विक्रम लँडरने पृथ्वीवर पाठविलेला पहिला फोटो. Wowww #JustAsking असं म्हटलं आहे. त्यावरून प्रकाश राज मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.

अभिनेते प्रकाश राज यांच्या पोस्टवर दिलीप मंडल नावाच्या व्यक्तीने प्रतिक्रीया देतांना म्हटले आहे की, चंद्रयान भारताचा एक प्रोजेक्ट आहे. आमच्यासारखे करोडो भारतीय हे चंद्रयान सफल व्हावं म्हणून मनोकामना करत आहोत आणि तुम्ही एक आहात जे पक्ष आणि देशातील अंतर विसरून गेले आहात.

कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्ट्री ऑफ मीम्स नावाने असलेल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्वीट करून म्हटले आहे की, चंद्रयान-३ चा राजकीय विचारसरणीच्या पलिकडे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा. राजकीय आणि राष्ट्र यांच्यातील ट्रोलिंगमधील फरक जाणून घ्या. नाहीतर तुमचे चित्रपट आल्यानंतर तुमची पँट ओली करू.

छोटा डॉन नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून म्हटलं आहे की, डाव्या विचारसरणीच्या लोकांना चंद्रावर भगवा ध्वज दिसत असेल.

सुदर्शन टीव्हीच्या पत्रकार मीनाक्षी श्रियान यांनी प्रकाश राज यांचा निषेध केला आहे. तसेच तुम्ही रियल व्हिलन आहात. देशाचे तुम्ही दुश्मन असल्याचे म्हटले आहे. त्यावर के के मेनन यांचे एक मीम्स पोस्ट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देशाचे दुश्मन बॉर्डरच्या पलिकडेच नसतात. तर देशातसुद्धा असतात, असं म्हटलं आहे.

प्रकाश राज यांनी दिलं स्पष्टीकरण

द्वेषाला फक्त द्वेषच दिसत असतो. मी आर्मस्ट्राँगच्या काळातील विनोदाचा संदर्भ दिला. मी आमच्या केरळच्या चहावाला दाखवला होता. पण ट्रोलर्सना कोणता चहावाला दिसला? जर तुम्हाला जोक समजला नसेल तर जोक तुमच्यावर झालाय. मोठे व्हा, असं म्हणत प्रकाश राज यांनी टोला लगावला आहे.

Tags:    

Similar News