कोल्हापुरच्या प्रज्वल चौगुलेच्या फोटोची जगात चर्चा

Apple iphone ने कोल्हापुर येथील प्रज्वल चौगुले याच्या फोटोची दखल घेत त्याचा गौरव केला.

Update: 2022-04-16 02:52 GMT

Apple iPhone आयोजित एपल शॉट ऑन मॅक्रो चॅलेंज या स्पर्धेत कोल्हापुरच्या प्रज्वल चौगुले याने काढलेल्या फोटोची जगभरात चर्चा रंगली आहे. तर या स्पर्धेत त्याने टॉप 10 मध्ये समावेश झाल्यामुळे त्याचा Apple कंपनीने गौरव केला आहे.

Apple Shot on Macro Challenge या स्पर्धेत कोल्हापुरच्या प्रज्वल चौगुले याने टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने काढलेल्या कोळ्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदूचा फोटो निसर्गाचे एक वेगळेच रुप दाखवतो. त्यामुळे या फोटोचे जगभर कौतूक होत आहे.

कोल्हापुरच्या प्रज्वल चौगुले याने आपल्या Apple 13 pro या मोबाईलमध्ये कोळ्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदूंचा फोटो काढला. तर त्याने हा फोटो एपल शॉट ऑन मॅक्रो चॅलेंज या स्पर्धेसाठी पाठवला. तर या फोटोची दखल घेत Apple ने त्याचा समावेश टॉप 10 मध्ये केला. या टॉप 10 मध्ये यादीत चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिका या देशातील फोटोग्राफर्सचा समावेश आहे.

प्रज्वल चौगुले याने मिळवलेल्या यशाबद्दल कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करून अभिनंदन केले आहे. यामध्ये सतेज पाटील म्हणाले, ऍपल कंपनीने आयोजित केलेल्या 'शॉट ऑन आयफोन' या फोटोग्राफी स्पर्धेत कोल्हापूरच्या प्रज्वल चौघुले यांचा जगातील टॉप टेनमध्ये सामावेश झाला आहे. चीन, हंगेरी, इटली,स्पेन,थायलंड आणि अमेरिका या देशांतील इतर नऊ विजेत्यांमध्ये भारत देशातून कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेच्या समावेश झाला आहे.

प्रज्वल यांनी शिवाजी विद्यापीठ येथे काढलेल्या कोळ्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदूचा फोटो काढला जगभरात चर्चिला जात आहे. प्रज्वल यांना एका ठिकाणी कोळ्याच्या जाळ्यावर दवबिंदू पडल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या आयफोन 13 प्रो मध्ये तो फोटो टिपला.हा फोटो निसर्गाचं एक विशेष रुप दाखवतो.

प्रज्वलने कोल्हापूरचे नाव आपण जगात नेले असून आम्हां कोल्हापूरकरवासीयांना त्याचा अभिमान आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन आणि आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!, अशा शब्दात सतेज पाटील यांनी प्रज्वलचे अभिनंदन केले आहे.

Tags:    

Similar News