अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. अनेक आमदार, खासदारांची द्विधा मनस्थिती झालेली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे अजित पवारांची भेट घेत आहेत. आज माजी राज्यमंत्री राष्ट्रवादीच्या आमदार प्राजक्त तनपुरे हे अजित पवार यांची भेट घेणार आहेत.