एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा

Update: 2021-11-12 11:42 GMT

भंडारा : मागील 15 दिवसांपासून एस.टी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करण्यात आले आहे, दरम्यान भंडारा येथे सुरू असलेल्या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.

ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळी सारखा सण बेसन भाकरी खाऊन साजरा केला आणि कोरोनासारख्या महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी अविरत काम केले अशा एस.टी कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला आहे.हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे यावेळी उपस्थितांनी म्हटले आहे.

ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले आहे. अशा कर्मचाऱ्यांचे दुःख महाराष्ट्र सरकारने समजून घ्यावे. एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष सदैव एस.टी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहील अशी प्रतिक्रियाही प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी यावेळी दिली.

दरम्यान आज राज्यातील अनेक आगारातून खासगी चालकांच्या मदतीने बसेस सोडण्यात आल्या. तर अनेक ठिकाणी आगारात सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थळावरील मंडप हटविण्यात आले,अहमदनगर येथील तारकपूर बस स्थानकावरील मंडप काढून घेण्याच्या सूचना एसटी प्रशासनाने दिल्या. तर अहमदनगर शहरातील तारकपूर, माळीवाडा आणि पुणे बस स्थानक परिसरात आरटीओ कर्मचारी खासगी वाहनातून प्रवासांन बसवून देताना आढळुन आले. प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून थेट आरटीओ विभागाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत मात्र, अनेक ठिकाणी खासगी वाहतूकदार प्रवासांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेत असल्याच्या घटना समोर येत आहे.

Tags:    

Similar News