एस टी महामंडळात काम करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांवरून प्रज्ञा सातव आक्रमक

Update: 2022-12-21 08:57 GMT

सध्या महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. 19 डिसेंबर पासून या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. बुधवारी (21 डिसेंबर) काँगेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी अधिवेशनचये तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात लालपरी म्हणून प्रचलित असणाऱ्या एस टी महामंडळात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतागृह आणि विश्रांतीगृह याच्या संबंधित प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी महिलांच्या संबंधित अनेक प्रश्नांवर भाष्य केले. शिवाय महिलांच्या या प्रश्नांवर गांभीर्याने विचार आणि काम राज्यसरकरमार्फत करण्यात यावे अशी मागणी देखील केली. प्रज्ञा सातव यांच्या या मागणीला महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले.

महाराष्ट्राच्या एस टी महामंडळात मोठ्या प्रमाणावर महिला कर्मचारी काम करत असतात. त्या महिलांना वेळोवेळी स्वछतागृह आणि विश्रांतीगृह यासंबंधीच्या अडचणींचा सामना करावा लागत असतो. या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी अशी विनंती यावेळी त्यांनी केली. याशिवाय महिलांना ठिकठिकाणी आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे ही क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचेही प्रज्ञा सातव यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात संपूर्ण एस टी महामंडळाचे कामकाज ठप्प होते. त्याच कारणाने अनेक आगरांतील स्वच्छतागृहे बँड राहिल्याने अतिशय घाण अवस्थेत आहेत. यावर लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती देखील प्रज्ञा सातव यांनी यावेळी केली.

दरम्यान, प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन यावेळी शंभूराज देसाई यांनी दिले आहे. याशिवाय महाराष्ट्रात उत्कृष्ट स्वछता राखणाऱ्या आगाराला बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी शंभूराज देसाई यांनी केली. याशिवाय अनेक ठिकाणी स्वछतागृहां संबंधित काम एजन्सीजला देण्याची यामध्ये एजन्सीजला बांध, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर स्वछतागृह उभारण्याची प्रक्रिया देखील काही दिवसात सुरू करण्याचे आश्वासन देखील यावेळी शंभूराज देसाई यांनी केले आहे.

सध्या महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर स्थापित झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हे दुसरे अधिवेशन आहे. या अधिवेशनच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधी पक्षमार्फत सरकारवर ताशेरे ओढण्यास सुरुवात झाली. विरोधी पक्षाने उवस्थित केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देण्याचे काम सध्या सरकारच्या मार्फत केले जात आहे. त्यामुके सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या चांगलीच खडाजंगी रंगली असक्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसात हा सामना आणखी रंगेल अशी आशा राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

Tags:    

Similar News