मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात सकारात्मक राजकीय चर्चा

मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि वचिंत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात तासभर लोकसभेच्या निवडणूकीवरून राजकीय खलबत!

Update: 2024-03-27 03:26 GMT

मंगळवारी रात्री उशीरा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर अंतरावली सराटीमध्ये दाखल झाले. त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या दोंघामध्ये सुमारे एक तास राजकीय चर्चा रंगली होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.


काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता ते म्हणाले की "लोकसभा निवडणूक आणि पुढील वाटचाल कशी असणार यासंदर्भात चर्चा झाली, वेळ आल्यावर या संदर्भात सविस्तर भाष्य करणार असून मनोज जरांगे यांच्या भेटी संदर्भातील चर्चा सकारात्मक झाली असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगिलतं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे ?

दरम्यान यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी "येत्या 30 तारखेला समाजाला विचारून पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. आपल्याला राजकारणाशी काही देणं घेणं नाही. मात्र, समाजाने लढायचे ठरवले तर पूर्ण ताकदीने समाज लढनार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे. गावागावत जाऊन समाज बांधवांना विचारून याबाबत 30 तारखेच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी माध्यमांसमोर बोलताना सांगितले आहे..

मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर झालेल्या सकारात्मक राजकीय चर्चेनंतर राज्यात लोकसभा निवडणूकी नवी राजकीय समीकरने तयार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Tags:    

Similar News