पोर्तुगालमध्ये रुग्णालयात प्रवेश न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू, आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा
पोर्तुगालमध्ये एका गर्भवती महिलेला रुग्णालयात प्रवेश न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा डेमिडो यांनी राजीनामा दिला.;
पोर्तुगालमध्ये भारतीय पर्यटक असलेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात प्रवेश न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लिस्बन येथे एका भारतीय गर्भवती असलेल्या महिलेला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोर्तुगालमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी अखेर राजीनामा दिला. तर हा राजीनामा पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी स्वीकारला आहे.
इमर्जन्सी सेवा बंद केल्याने आणि रुग्णालयात डॉक्टरांचा तुटवडा असून गर्भवतींना योग्य सेवा मिळत नसल्याने पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांच्यावर सातत्याने टीका होत होती. मात्र मार्टा टेमिडो यांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाचे पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी कौतूक केले होते. तर मार्टा टेमिडो यांनी देशातील आरोग्यव्यवस्था मजबूत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर पर्यटक असलेल्या भारतीय महिलेला रुग्णालयात बेड न मिळाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका होत होती. त्यामुळे मार्टा टेमिडो यांनी अखेर राजीनामा दिला. त्या 2018 पासून आरोग्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.
नेमकं काय घडलं?
भारतीय पर्यटक महिला पोर्तुगालमध्ये प्रस्तुतीसाठी एका रुग्णालयात गेली. मात्र देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयात या महिलेला बेड मिळाला नाही. त्यामुळे या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाल्याने पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला.