पूजा चव्हाण प्रकरण, संजय राठोड अखेर मीडियासमोर या दिवशी येणार

Update: 2021-02-20 12:24 GMT

पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात नाव आलेले आणि गेल्या १३ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड अखेर सगळ्यांसमोर येणार आहेत. पोहोरा देवी संस्थानचे महंत सुनील महाराज आणि जितेंद्र महाराज यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. शनिवारी या प्रकऱणासंदर्भात बंजारा समाजाच्या महंतांची बैठक झाली आणि या बैठकीत संजय राठोड यांनी पोहरा देवीच्या दर्शनाला निमंत्रित कऱण्याचा निर्णय झाला. त्यानुसार संजय राठोड यांनी २३ तारखेला दर्शनाला येणार असल्याचे कळवले आहे, अशी माहिती महंत यांनी दिली आहे. या दिवशी संजय राठोड हे मीडियाशी देखील बोलण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाण या तरुणीने काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राहत्या इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पण याप्रकरणी तिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असून समाजमाध्यमांमध्ये काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. तसेच याप्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने आणखी खळबळ उडाली आहे. त्यातच संजय राठोड हे गेले १३ दिवस नॉट रिचेबल असल्याने त्यांच्याबद्दलही उलटसुलट चर्चा आहे. आता २३ तारखेला संजय राठोड या प्रकरणी मौन सोडणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News