शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार?
पश्चिम बंगालमधील निवडणुकांची रणनीति तयार करणारे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. ही भेट आगामी 2024 च्या निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. तीन तास चालेल्या या बैठकीत 2024 ला विरोधी पक्षाचा चेहरा कोण असेल या संदर्भात चर्चा झाल्याचं समजतंय.
पश्चिम बंगालच्या निवडणूकीत मोदी लाट असतानाही प्रशांत किशोर यांच्या रणनीतिने भाजपचा सुफडा साफ झाला होता. विशेष बाब म्हणजे भाजप या ठिकाणी 100 पेक्षा अधिक जागा जिंकू शकणार नाही असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता. तो खरा ठरला. त्यानंतर आता प्रशांत किशार यांचं राजकीय वजन वाढलं आहे.
त्याचाच भाग म्हणून शरद पवार सारख्या दिग्गज राजकारणी व्यक्तीने प्रशांत किशोर यांच्यासोबत 3 तास बैठक घेतली. या बैठकीत जयंत पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे राज्यासह आगामी राष्ट्रीय आघाडीबाबत ही चर्चा झाल्याचं स्पष्ट होतं.