'भाजप'चे धोरण शेतकऱ्यांना उपाशी मारत आहे- राहुल गांधी
राहुल गांधी यांनी वाशिम जिल्ह्यात सभा घेतली, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना राहुल गांधी भावूक होताना पाहायाला मिळाले. तसेच त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ही भाषण केले.
आज भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यात असताना राहुल गांधी यांनी सायंकाळी सभा घेऊन भाजपवर टीका केली. यादरम्यान राहुल गांधी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलताना भावूक होताना आपल्याला पाहायाला मिळाले.राहुल गांधी म्हणाले की "भाजपची धोरणं शेतकऱ्यांना उपाशी मारत आहे" ज्यावेळी राहुल गांधी पदयात्रेत शतकऱ्यांशी संवाद साधत असतात त्यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतएकच समस्या ऐकायला मिळते "आमच्या पिकेला योग्य भाव मिळत नाही. केंद्र सरकारमुळे आम्हाला पिकविमा मिळत नसल्याने आमची लुट सुरु आहे. शेतकऱ्यांचा माल बाजारात आला की आयात निर्यातीचे धोरण बदलले जातात आणि दर पा़डले जातात. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक असणारे डिझेल महाग केले जाते.
ज्या देशाचा शेतकरी पाठीचा कणा आहे त्या शेतकऱ्याला संपवलं जात आहे आणि आपण भाजपला देशभक्त म्हणायच का" असा देखील प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील असे आश्वासन दिले होते. "तुमच्या खात्यात १५ लाख आलेत का?" असा सवाल राहुल गांधी यांनी सभेत उपस्थित असणाऱ्या लोकांना विचारला. राहुल गांधी पुढे म्हणाले "८ नोव्हेंबरला ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. देशातील काळा पैसा संपला का?" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण राहुल गांधी यांनी करुन दिली.
त्यामुळे भाजप आपल्याला कस फसवतंय याची जाणीव राहुल गांधी यांनी सभेत करुन दिली. राहुल गांधी म्हणाले की "जीएसटी हे हत्यार आहे त्यामुळे छोटे व्यापारी संपवले जाऊ शकतात. तीन काळे कृषी कायदे शेतकऱ्यांना संपवण्यासाठी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागले तेव्हा अनेक शेतकऱ्यांवर हल्ले करण्यात आले होते". राहुल गांधी ज्यावेळी शतकऱ्यांच्या प्रश्नांबदद्ल बोलतात. त्यावेळी राहुल गांधी भावूक होताना पाहायाला मिळातात. केंद्रसरकारच्या अग्निपथ योजनेवरून राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.
"केंद्रसरकारने अग्निपथ योजना आणली, या योजनेअंतर्गत सहा महिने प्रशिक्षण घ्या, चार महिने आर्मीत जा आणि बेरोजगार व्हा. आणि पूर्ण आयुष्य बेरोजगारात काढा ही भाजपची देशभक्ती आहे का?" तरुणांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करुन राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला. "रेल्वेचा पर्याय खासगीकरणामुळे संपवला जात आहे. शेतकरी ५० हजार रुपयांचे कर्ज काढताना मेटाकुटीला येतोय तरीही सरकारला काहीच घेण देण नाही." असे राहुल गांधी म्हणाले "हिंसा, द्वेष, बेरोजगारीच्या विरोधात भारत जोडो यात्रा हि काढली जात आहे"असे वक्तव्य करुन राहुल गांधींनी सभा संपावली