मणिपूरला निघालेल्या राहुल गांधी यांचा पोलिसांनी अडवला रस्ता, काँग्रेसचा आरोप, भाजपनेही केला पलटवार

मणिपूरमध्ये बिघडलेली आहे. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधी हे मणिपूर दौऱ्यावर निघाले होते. मात्र त्यांना पोलिसांनी अडवल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकास्र सोडले.;

Update: 2023-06-29 11:02 GMT


मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे मणिपूर दौऱ्यावर निघाले होते. दरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवले. त्यावरून काँग्रेसने ट्वीट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

यामध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, राहुल गांधी हे मणिपूरमधील हिंसाचाराने पीडितांच्या कुटूंबियांच्या भेटीसाठी निघाले होते. मात्र भाजपने पोलिसांच्या माध्यमातून राहुल गांधी यांना अडवले. राहुल गांधी हे शांतीचा संदेश घेऊन मणिपूरला गेले होते. परंतू सत्तेत असलेले लोक शांती, प्रेम आणि भाईचाऱ्याचा द्वेष करतात. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं की, हा देश गांधीच्या मार्गाने आणि प्रेमाच्या मार्गाने चालणार आहे, अशा शब्दात काँग्रेसने भाजपवर टीकास्र सोडले.

काँग्रेसने केलेल्या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. त्यामुळे रस्तामार्गे राहुल गांधी यांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना राहुल गांधी यांना रस्तामार्गे नाही तर हेलिकॉप्टरने जावं, अशी विनंती पोलिसांनी केली होती. मात्र राहुल गांधी यांनी पोलिसांचं ऐकण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी राहुल गांधी राहुल गांधी यांना अडवल्याचे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले.

Tags:    

Similar News