राज्यात पोलीस भरतीचे फॉर्म आजपासून सूरू; या तारखेपर्यंत भरता येणार ऑनलाईन फॉर्म
राज्यात पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झाले असून सरकारकडून पोलीस भरतीसाठी १७ हजार पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबई / वैभव आदोडे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीची मागणी राज्यभरातून करण्यात येत होती, त्या पार्श्वभूमीवर आता राज्य राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत अर्ज प्रक्रिया सूरू केली आहे. मागील काही वर्षांपासून राज्यात मोठी पोलीस भरती झालेली नाही. राज्यसरकारकडून आता १७ हजार पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
कोणत्या-कोणत्या पदासाठी भरती आहे.
या भरतीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी आजपासून अर्ज करू शकता, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे.
अर्जासाठी शुल्क भरणा (Online Payment)
या पोलीस भरतीमधील कोणत्याही पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना (Open Catagory Applicants) ४५०/- रूपये तर इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना (Reseverved Catagory Applicants) ३५०/- रूपये भरावे लागणार आहे.
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पोलीस भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराची किमान मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्व साधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा ही १८ ते २८ वर्षे आहे.
कशी असेल भरती प्रक्रिया?
आजपासून सूरू होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आधी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात येईल.