Parli News : बीड जिल्ह्यातल्या परळी तालूक्यात परळी रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या रुळावर सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घटली आहे. सुभाष दुधाळ असे या पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. परळीत रेल्वे स्थानक रूळावर त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी परळी रेल्वे स्थानक परिसरात उड्डाणपूलाखालील रेल्वेरूळावर सुभाष दुधाळ यांचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी रात्री त्यांनी रेल्वेच्या खाली उडी मारून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे.
दरम्यान, दुधाळ हे पोलीस खात्यातील सीआयडी विभागात पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची बीडमधून पुण्यात सीआयडी पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. त्यांच्या मृतदेराजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून कौटूंबिक कारणाने त्यांनी जिवन संपवल्याची माहिती आहे.
सध्या परळी उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. दरम्यान दुधाळ परळीत कुठल्या कारणासाठी आले होते याविषयी अद्याप माहिती मिळू शकली नाही.