औरंगाबाद अत्याचार प्रकरण : पिडीत कुटूंबांची निलम गोर्हेंनी घेतली भेट, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करणार
काही दिवसांपुर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात दरोडा आणि बलात्काराची घटना घडलेल्या गावी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी भेट दिली. पिडीत कुटूंबांशी चर्चा करून त्यांनी त्यांना दिला दिला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना "ही घटना अमानवीय आहे" असं म्हणत सदर घटनेचा निषेध नोंदवला. पोलिसांनी या घटनेचा चांगला तपास करून सर्व आरोपींना जेरबंद केले आहे.
"सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करू. शिवाय सदर प्रकरणातील आरोपींना कठेरात कठोर शिक्षा होऊन पिडीत कुटांबाना न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल", असे त्या म्हणाल्या. गेल्या काही दिवसांपासुन अनेक राजकीय नेते पिडीत कुटूंबाची भेट घेत आहेत आणि न्याय देण्याचे आश्वासन देत आहेत. खरच या आश्वासनांची पुर्तता होते का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.