कोरोनानंतरचा निर्बंधमुक्त गणेशोत्सव नुकताच संपला आहे. या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकाही यंदा धुमधडाक्यात झाल्या. पण या मिरवणुकांमध्ये अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि अधिकारीही सामील होऊन नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण या प्रकारामुळ काही जणांनी पोलिसांवर टीका केली आहे. पण याच टीकेच्या ओघात पोलिसांना सल्ला देणाऱ्या एका चॅनेलच्या संपादकांना ट्विटरवर चांगलेच ट्रोल व्हावे लागले आहे.
पत्रकार प्रसाद काथे यांनी ट्विट करत "पोलिसांनो, गणवेश घालून नाचू नका. खाकी नाचायला नव्हे, गुन्हेगाराला कायद्याच्या तालावर नाचवायला दिली आहे. जय हिंद " असा सल्ला दिला आणि एवढेच नाही तर त्यांनी @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @Devendra_Office @CMOMaharashtra
पोलिसांनो, गणवेश घालून नाचू नका.
— Prasad Kathe (@PrasadVKathe) September 10, 2022
खाकी नाचायला नव्हे, गुन्हेगाराला कायद्याच्या तालावर नाचवायला दिली आहे.
जय हिंद@DGPMaharashtra @CPMumbaiPolice @Devendra_Office @CMOMaharashtra
मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त असे सगळ्यांना टॅग देखील केले.
पण त्यांच्या या ट्विटवर अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी टीका करत त्यांना काही सवाल देखील विचारले.
@Vaibhav7pute या वापरकर्त्याने " पत्रकारांनो , हाती कलम घेऊन दलाली करु नका. ती कलम देशाच्या संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याकरिता दिली आहे. संविधानाचे अवमूल्यन करण्यासाठी अथवा पायदळी तुडविण्यासाठी नाही. हे लक्षात घ्या !! जय भारत" असे म्हणत टीका केली आहे.
तर @Shaikh_Mohsin12 या वापरकर्त्याने "२४ तास duty करतात जर मिरवणूक असेल तर शेवटी तीपण माणसंच आहेत. त्यांना पण ताणतणाव मधून थोडी मुक्तता हवी ना. ह्यावर objection घेण्यासारखे काहीच नाही." असे म्हटले आहे.