पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर दोन दिवस होणार साक्ष
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगल प्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर दोन दिवस साक्ष होणार आहे.
मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी ही साक्ष घेतली जाणार आहे. शुक्ला यांच्या सोबत हर्षाली पोतदार, लक्ष्मी गौतम, बिपिन बिहारी यांचीही साक्ष नोंदवणी जाणार आहे. १५ ते २० नोव्हेंबर असे तब्बल पाच दिवस साक्ष नोंदवली जाणार आहे. हर्षाली पोतदार यांनी दिलेल्या निमंत्रणावर अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानी हा शनिवारवाडा येथे झालेल्या परिषदेत सहभागी झाला होता. ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या परिषदेच्या आयोजनातही पोतदार सक्रिय होती.मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीही साक्षीकरिता आयोगासमोर हजर राहण्याबाबत समन्स काढण्याच्या अर्जास कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाने मान्यता दिली होती.