सांगलीत ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. त्यावेळी एका महाभागाने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते हे मंत्री वडेट्टीवार यांचा सत्कार करत असताना त्यांच्या खिशातून भर स्टेजवर सर्व लोकांच्या समोर 50 हजार रुपये लंपास केले. तर हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र पोलिसांनी या महाभाग चोराचा शोध घेत त्याला अटक केली. त्यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला.