रावसाहेब दानवे यांची सभा उधळण्याच्या तयारीत असलेले काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जालन्यातील अंबड शहरात आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी काँग्रेसच्या ८ ते १० कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतलं आहे.

Update: 2021-08-23 08:29 GMT


जालना : जालन्यातील अंबड शहरात आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी काँग्रेसच्या ८ ते १० कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतलं आहे.

बदनापूर येथील सभेत दानवे यांनी राहुल गांधी यांचा सांड असा उल्लेख केला होता. यामुळे दानवे यांचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी दानवे यांचा पुतळा जाळला होता.

दानवे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधाना प्रकरणी माफी मागावी अन्यथा त्यांची सभा उधळून लावू असा इशारा अंबडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर आज अंबड पोलीसांनी काँग्रेसच्या ८-१० कार्यकर्त्यांना दानवे शहरात येण्याआधीच ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं आहे.

Tags:    

Similar News