...म्हणून ई-वाहनांवर कारवाई करतांना पोलिसांची डोकेदुखी वाढली

Update: 2021-10-03 12:23 GMT

शासनाकडून ई वाहनांना प्रोत्साहन देण्यात आले असून ही वाहने परवाना किंवा नंबरप्लेट विना रस्त्यावर धावत आहेत.एकीकडे नो पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या या वाहनावर कारवाई करावी तर कशी करावी हा प्रश्न वाहतूक विभागासमोर उभा ठाकला असताना, जर या वाहनाचा अपघात झाला किंवा एखाद्या गुन्ह्यात या वाहनाचा वापर केला गेला तर आरोपीचा शोध घ्यावा कसा? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. मात्र, याचे उत्तर पोलिसांकडे आणि आरटीओकडे देखील नाही यामुळे या वाहनचालकांना आवाहन करण्याखेरीज आपल्या हातात काही नसल्याची हतबलता वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गेले काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाला देखील वाहतूक अडथळा होऊ नये यासाठी टोईंग व्हॅनच्या साहाय्याने बाजूला करत कारवाई सुरू आहे, मात्र पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर ई बाईक खरेदीला चालना देण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याने मागील काही दिवसांपासून शहरात ई-बाईक आणि इलेक्ट्रिक चार चाकी वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. मात्र, या ई वाहनांमुळे वाहतुक विभागाची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. दररोज कितीतरी इलेक्ट्रिक वाहने नो पार्किंग मध्ये उभी असतात. मात्र, असा वाहनांवर कारवाई करतांना याबाबत कोणत्याही सूचना किंवा निर्देश नसल्याने अडचण होत असल्याचे उत्तर वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.

Tags:    

Similar News