पिंपरी चिंचवड : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील १२४ कर्मचारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कायमस्वरुपी आस्थापनेवर घेणेबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांचेकडूनही याबाबत सुचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या.
स्वारगेट, पुणे येथे झालेल्या पी.एम.पी.एम.एल संचालक मंडळाच्या बैठकीत पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील १२४ कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी वर्ग करणेस तसेच सदर कर्मचारी सेवेतून सेवानिवृत्त झालेनंतर त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या असणाऱ्या सर्व देय रकमा ग्रॅच्युटी, रजा वेतन, प्रॉव्हिडंट फंड याची रक्कम अदा करण्यास अखेर मान्यता मिळाली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड मनपाच्या महापौर उषा ढोरे यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पुणे महानगर परिवहन महामंडळाला संचलन तुट दिली जाते. सोबतच पी.सी.एम.टी. कर्मचा-यांना येण्या-जाण्यास लागणारा वेळ विचार करुन महापौर माई ढोरे यांनी बैठकीत १२४ कर्मचा-यांना महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी वर्ग करणेसंबंधी आग्रही भुमिका घेतल्याने कर्मचा-यांचे कायमस्वरुपी वर्ग करण्यास अखेर मान्यता मिळाली आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड मनपाकडून देण्यात आली आहे.