पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Update: 2021-04-20 17:58 GMT

भारतातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना म्हणाले...

कोरोनाच्या विरोधात देश आज पुन्हा एकदा खूप मोठी लढाई लढत आहे. काही काळापर्यंत परिस्थीती सुधारली होती. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट वादळ होऊन आली. जे कष्ट तुम्ही सहन केले आहेत. जे आपण सहन करत आहात. मला याची पूर्ण जाणीव आहे. ज्या लोकांनी आपल्या नातेवाईकांना कोरोनामुळं गमावलं. मी त्यांच्यासाठी सर्वदेशवासियांच्या वतीने दु:ख व्यक्त करतो. मी तुमच्या दु:खात सहभागी आहे. संकट मोठं आहे. आपल्या सर्वांना मिळून एक संकल्प करून, आपली इच्छा शक्ती आणि पूर्ण तयारी करून या संकटाला सामोरं जायचं आहे.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

यावेळेला कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याप्रमाणे औषधं कंपन्यांनी औषधांचं उत्पादन अधिक वाढवलं आहे. सध्या हे औषधांचं उत्पादन अधिक वाढवलं जाणार आहे. त्यासाठी औषधं कंपन्यांची मदत घेतली जात आहे. आपलं औषधं क्षेत्र मजबूत आहे. रुग्णालयात बेडची संख्या वाढवली जात आहे.

'कठीन परिस्थीतीत आपल्याला धैर्य गमावून चालणार नाही. तरच आपण विजय मिळवू शकू. जे निर्णय घेतले गेले आहेत. त्या निर्णयामुळे स्थिती लवकरच सुधारेल. ऑक्सिजन ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दिशेने वेगाने काम सुरु आहे.

प्रत्येक गरजू रुग्णाला ऑक्सिजन मिळावा यासाठी काही स्तरावर उपाय केले जात आहेत. राज्यामध्ये लावलेले ऑक्सिजन प्लाट, राज्याला 1,00,000 सिलेंडर पोहोचवले आहेत. उद्योगधंद्यात वापरला जाणारा ऑक्सिजन आता दवाखान्यात वापरण्यात येत आहे. रेल्वेचा देखील वापर करण्यात येत आहे. प्रत्येक स्तरावर उपाय केले जात आहेत.

आज जगातील सर्वात स्वस्त लस भारतात आहे. जगात सर्वात वेगानं 12 कोटी लोकांना कोरोनाची लस भारतात देण्यात आली आहे. 1 मे नंतर 18 वर्षावरील सर्वांना मोफत दिली जाणार आहे.

मोदींनी सांगितलं की हे एक टीम ने एकत्र केलेल्या प्रयत्नाचं फळ आहे की, भारताने मेड इन इंडिया लसीसोबत जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरु केलं आहे.

आजच्या स्थितीत आपल्याला देशाला लॉकडाउनपासून वाचवायचं आहे. राज्यांनी देखील लॉकडाउनला अंतिम पर्याय म्हणून पाहावं. लॉकडाउनपासून वाचण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण अर्थव्यवस्थेसोबतच देशवासीयांच्या आरोग्याची देखील काळजी घेऊया

मायक्रो कन्टेंटमेंट झोनवर अधिक भर द्यावा

कठीण काळात आपण धैर्य सोडायला नको. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रयत्न करूया. तेव्हाच आपण विजय मिळवू शकतो. हाच मंत्र समोर ठेऊन देश दिवसरात्र संघर्ष करतो आहे.

भारतात तयार होणाऱ्या व्हॅक्सिनचा अर्धा भाग हा राज्य सरकारांना देणार आहे.

Tags:    

Similar News