पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
अवघ्या जगाला कोरोनाने विळखा घातला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (28 नोव्हेंबरला) पुण्यात येणार आहेत. त्याच दिवशी ते सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार आहेत. दुपारी 1 ते 2 या दरम्यान मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीच्या निर्मितीबाबत माहिती घेतील. त्यानंतर 4 डिसेंबरला 100 देशांचे राजदूत सिरम इन्स्टिट्यूट आणि हिंजवडीतील जिनेव्हा बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात कोरोना लसीची निर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. इंग्लडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी कोविडशिल्ड ही लस अंतिम टप्प्यात असल्याचं सिरमचे अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आहेत आणि ते सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्याच दिवशी ते सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार आहेत. दुपारी 1 ते 2 या दरम्यान मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीच्या निर्मितीबाबत माहिती घेतील. त्यानंतर 4 डिसेंबरला 100 देशांचे राजदूत सिरम इन्स्टिट्यूट आणि हिंजवडीतील जिनेव्हा बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत.
पुणे दौऱ्यानंत नरेंद्र मोदी हैदराबादला जाणार असून तिथे भारत बायोटेक कंपनीला भेट देतील त्यानंतर ते गुजरात अहमदाबादमधील झायडस बायोटेकला भेट देतील. संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीवर मोठ्या वेगाने काम सुरू आहे. यातच पुण्यातल्या कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर असं झालं तर कोरोनाचा संसर्ग संपवण्यात भारताला मोठं यश येईल.
सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) देशातील 15 केंद्रांवर कोव्हीशिल्ड लसीच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्या समाधानकारक असल्याची माहितीही सिरम आणि आयसीएमआरकडून व्यक्त करण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे आता सिरमची कोरोना लस साधारण 225 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाउंडेशनबरोबर महत्त्वपूर्ण करार झाला असून या करारानुसार बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूट तब्बल 100 मिलियन डोस तयार करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा?
सकाळी 11.10 वाजता – अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण
दुपारी 12.25 वाजता – पुणे विमानतळावर दाखल
दुपारी 12.30 वाजता – पुणे विमानतळावरुन MI-17 या हेलिकॉप्टरद्वारे हेलिपॅड असणाऱ्या ठिकाणी उड्डाण
दुपारी 12.50 वाजता – पुणे हेलिपॅडजवळ
दुपारी 12.55 वाजता – हेलिपॅडजवळून रस्तेमार्गे सिरम इन्स्टिट्यूटसाठी रवाना
दुपारी 1 वाजता – सिरम इन्स्टिट्यूटजवळ दाखल
दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत – सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीचा आढावा
दुपारी 2.30 वाजता – पुन्हा पुणे विमानतळाकडे रवाना
दुपारी 3.45 वाजता – पुण्याहून हैद्रराबाद विमानतळाकडे दाखल