केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार, महाराष्ट्रातून कोणाला संधी...?

Update: 2021-06-11 15:19 GMT

केंद्र सरकार कॅबिनेट विस्तार करणार असल्याचं समोर आलं आहे. कोरोना काळात मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. त्यानंतर आता काही मंत्रालयातील मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याचं समजतंय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे BJP राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या सोबत एक बैठक घेतली. या बैठकीनंतर मंत्र्यांचं मूल्यमापन करुन मोठे बदल केले जाणार आहेत.

पुढील वर्षी उत्तर प्रदेश सारख्या राज्याची निवडणूक आहे. गेल्या 5 राज्याच्या निवडणूकीत भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळं आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालं नाही तर 2024 पर्यंत जनतेत वेगळा संदेश जाऊ शकतो. त्यामुळं काही कल्याणकारी योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधानांनी यावेळी केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांशी 5 तास चर्चा केली. यामध्ये धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावड़ेकर आणि हरदीप पुरी या मंत्र्यांचा सहभाग होता. यावेळी मोदी यांनी विविध मंत्रालयातील कामांचा आढावा घेतला. व योजनांची माहिती घेतली.

भारतात कोरोनाची दुसरी लाट घातक ठरत असताना लसीकरणाचा वेग कमी आहे. अशा वेळी जगभरातून मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्याच दरम्यान मोदी सरकारचा विस्तार होत असल्यानं आता महाराष्ट्रातून या विस्तारामध्ये कोणाला संधी मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

Tags:    

Similar News