"आजचे युग युध्दाचे नाही", पंतप्रधान मोदी यांचा व्लादिमीर पुतीन यांना सल्ला

Update: 2022-09-17 03:58 GMT

 उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेला ते उपस्थित होते. त्यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचे युग युध्दाचे नाही असा सल्ला पुतीन यांना दिली.

पंतप्रधान मोदी सध्या उझबेकिस्तान दौऱ्यावर आहेत. उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेला ते उपस्थित होते. या परिषदेमध्ये रशिया, पाकिस्तान, चीन या देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत त्यांच्या भेटी होणार होत्या. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्टाध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची बैठक पार पडली. रशिया-युक्रेन युध्दानंतर या दोन प्रमुख नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच भेट होती त्यामुळे तिच्याकडे संपुर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधाम मोदींना रशिया दौऱ्याचं निमंत्रणही दिलं.

याभेटीदरम्यान त्यांनी रशिया युक्रेन युध्दादरम्यान युक्रेनमध्ये अकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्य़ांना युक्रेन आणि रशियाच्या मदतीनेच पुन्हा भारतात आणायला मदत झाली असल्याचे सांगत या दोन्ही देशांचे त्यांनी आभार मानले. शिवाय आजचे युग हे युध्दाचे नाही सांगत अनेकदा याविषयावर आपलं बोलणं झालं असल्याचं मोदींना पुतीन यांना सांगितलं. तसंच रशिया आणि भारत संबंध गेल्या अनेक वर्षांपासून चांगले राहिले आहेत असंही मोदींनी पुतीन यांना सांगितलं.

य़ावर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी, "मला युक्रेनमधील संघर्षावरील आपली भूमिका आणि आपल्याला वाटणाऱ्या चिंतांबद्दल ठाऊक आहे. हे सर्व लवकरात लवकर संपावे अशी आमचीही इच्छा आहे. युध्दस्थळी काय घडत आहे याची आम्ही आपल्याला माहिती देऊ", अशी ग्वाही पंतप्रधाम मोदींना दिली.

Tags:    

Similar News