आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण केलं गेलं. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो आणि इ बस सेवेचं देखील उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर आज एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात मोदी यांच्या मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. तसंच महाराष्ट्राला मिळत असलेल्या सहयोगाबाबत मोदी यांचे आभार मानले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर निषेध व्यक्त केला.
मला पंतप्रधान यांना लक्षात आणुन द्यायचं आहे. की काही मान्यवर व्यक्तीकडून अनावश्यक वक्तव्य केले जात आहेत. ते महाराष्ट्राला परवडणारे नाही. त्यामुळं याकडेही लक्ष द्यावं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पाहा काय म्हणाले अजित पवार