पंतप्रधान मोदींनी दिलं WHO च्या प्रमुखांना गुजराती नाव

Update: 2022-04-20 12:51 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे(WHO) प्रमुख टेड्रोस यांना गुजराती नावं दिलं आहे.टेड्रोस यांनी केलेल्या विनंती नंतर त्यांना नाव दिलं.यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला तुलसीभाई म्हणताना आनंद होतो असं म्हटलं. भारतातील अनेक पिढ्यांनी तुळशीची पूजा केली असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस माझे चांगले मित्र आहेत. ते नेहमी मला भारतीय शिक्षकांनी मला शिकवलं आणि त्यांच्यामुळे मी घडलो असं सांगतात. आज त्यांनी मला मी पक्का गुजराती झालो आहे, माझ्यासाठी काही नाव ठरवलंय का? अशी विचारणा केली. त्यामुळे एक गुजराती म्हणून मी त्यांना तुलसीभाई म्हणणार आहे, असं मोदींनी सांगितलं.

सध्याची पिढी तुळशीला विसरत चालली आहे.अनेक पिढ्यांनी तुलशीची पुजा केली आहे.लग्नातही तुळशीचं रोप वापरतात.त्यामुळे तुम्ही आता आमच्यासोबत आहात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारतात पारंपारिक उपचार घेण्यासाठी येणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी लवकरच विशेष आयुष व्हिसा दिला जाईल असं जाहीर केलं. आयुष थेरपीचा लाभ घेण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी भारत लवकरच एक विशेष आयुष व्हिसा श्रेणी सुरू करणार आहे, असं मोदी म्हणाले.

Tags:    

Similar News