"Looking so sexy babe" पंतप्रधानांनी फॉलो केलेले मेहरोत्रा झाले viral

पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत असलेले मदन कुमार मेहरोत्रा सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण नेमकं कारण काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा...;

Update: 2023-01-16 03:31 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फॉलो केलेले मदन कुमार मेहरोत्रा सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मदन कुमार मेहरोत्रा यांनी केलेलं ट्वीट. (PM Narendra Modi Follow to Madan kumar Mehrotra)

मदन कुमार मेहरोत्रा यांनी 14 जानेवारी रोजी एक ट्वीट केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदन कुमार मेहरोत्रा (Madan Kumar Mehrotra) यांना फॉलो केल्याचे दिसत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर फॉलो केल्याने भाजप समर्थक असलेल्यामदन कुमार मेहरोत्रा यांनी अधबुथ, अविश्वसनीय, अकल्पनीय, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी फॉलो करणे गौरवान्वित असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदन कुमार मेहरोत्रा यांना फॉलो केले आहे. मात्र मदन कुमार मेहरोत्रा यांनी @WellaBernanda यांनी केलेल्या 'हे माझे बुब्स कसे दिसतात?' या ट्वीटवर 'खूप सेक्सी' दिसत असल्याची टिपण्णी केली आहे. त्यामुळे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारची टिपण्णी केल्याने मेहरोत्रा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

@someone_404 या ट्विटर वापरकर्त्याने दोन फोटो ट्वीट केले आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, कालपासून मोदी फॉलो करत असलेल्या ट्विटर अकाऊंटची झलक.

@mohdkafil15 या ट्वविटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, मोदी जी तुम्ही अशा प्रकारच्या लोकांना फॉलो करत आहात, ही शरमेची बाब आहे. कुठे आहे चरित्रहीन मीडिया आज तक आणि एबीपी न्यूज

@Thinkpadea यांनी ट्वीट मेहरोत्रा यांच्या ट्वीटवर रिप्लाय करताना म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे अशाच प्रकारचे सेक्सी फोटो फॉरवर्ड करण्यासाठी या व्यक्तीला फॉलो करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

लकमन गणेश यांनी रिप्लाय करत अशा प्रकारची मानसिकता असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी फॉलो करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News