पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने बोलावली मंत्रीमंडळाची बैठक, कोणत्या २ मुद्द्यावर असणार भर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ११ वाजता केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोदी सरकारला गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यातील उच्च न्यायालय तसंच सर्वोच्च न्यायालय तुमचा कोरोना विरोधात लढताना काय प्लान होता. असा सवाल करत आहेत. असं होत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून फेसबूकसारख्या माध्यमांनी पंतप्रधानांवर झालेली टीकेचे हॅशटॅग काढून पुन्हा पुर्ववत केले आहेत. त्यामुळं मोदी सरकारवर आता लोकांचा मोठा दबाव असल्याचं दिसून येत आहे.
त्यातच केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षापुढील सर्वांना कोरोना लसीकरण सुरु करण्याची घोषणा केली आहे. मात्र, लसींचा पुरेसा साठा नसताना लसीकरण कसं करणार? असा सवाल राज्य सरकारसमोर आहे. त्यातच देशातील अनेक राज्यात कोरोनाने रौद्र रूप धारण केलं असताना लोकांचे मृत्यू होत आहे. पुरेसा ऑक्सिजन साठा नसल्याने हॉस्पिटल चं प्रशासन हतबल झालं आहे. अनेक राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानं लोकांच्या पोटापाण्याचं प्रश्न निर्माण झालं आहे. त्यामुळं कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचं हत्यार असलेल्या लसीकर मोहिमेसाठी मोदी सरकार विशेष काही उपाययोजना जाहीर करणार का? त्याचबरोबर गोरगरिबांसाठी विशेष पॅकेज देणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.