अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे मोदींकडून कौतुक, सोशल मीडियावर समर्थक ट्रोल.....

Update: 2020-12-22 14:29 GMT

अलिगड मुस्लिम विद्यापीठ म्हणजे एक मिनी इंडिया आहे, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अलिगढ मुस्लिम विद्यापीठांच्या भिंतीवर देशाचा इतिहास कोरला आहे इथे शिकलेल्या विद्यार्थ्यांनी जगात भारताचं नावं गाजवलं आहे असेही गौरवोद्गार त्यांनी काढले. पण यानंतर मोदी भक्त मात्र सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर मोदी भक्तांना काजी जणांनी चिमटे काढले आहेत. यामध्ये द वायरच्या वरिष्ठ संपादक आरफा खानम शेरवानी यांनी ट्विटरवरुन एक ट्विट करत भक्तांना टोला लगावला आहे.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,


"अलिगड विद्यापीठाच्या कार्यक्रमात मोदी – अलिगड मुस्लिम विद्यापीठ म्हणेज मिनी भारत आहे

गोंधळेले भक्त – पण अलिगड मुस्लिम विद्यापीठ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे असेच आम्हाला शिकवले गेले आहे. साहेब अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या गोष्टी काय सांगत असतात?"

Similar News