PM to Uddhav thackeray: मोदी जेव्हा महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक करतात...

राज्यातील भाजपचे नेते कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक करत आहेत. वाचा काय म्हणाले मोदी...

Update: 2021-05-08 10:57 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan), हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री जयराम ठाकुर आणि तमिलनाडू चे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एमके स्टालिन यांच्याशी संवाद साधला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी COVID19 च्या विरोधातील लढाईमध्ये महाराष्ट्र चांगलं काम करत आहे. असं म्हणत महाराष्ट्राची स्तुती केली. एकीकडे राज्यातील भाजपचे नेते राज्यसरकारवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या फोनवरील संवादामध्ये मोदींनी महाराष्ट्राचं कौतूक केलं आहे.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली.

पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला मार्गदर्शन करत आहेत. त्याचा महाराष्ट्राला चांगला उपयोग होतो आहे. महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या त्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

दरम्यान मोदींचा उद्धव ठाकरे यांना अशा वेळी फोन आला आहे. ज्यावेळी राज्य सरकार ने लसीकरणाच्या कोविन Application संदर्भात केंद्राला पत्र लिहिलं. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला स्वत:चं वेगळं स्वतंत्र Application विकसीत करण्याची परवानगी मागितली आहे. सध्या लसीकरणासंदर्भात कोविन App व्यवस्थीत काम करत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळं लसीकरणाची नोंदणी करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Tags:    

Similar News