#RahulGandhiExposesBJP पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला घाबरुन भारताची जमीन बहाल केली- राहुल गांधी
भारत आणि चीनमध्ये लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण या प्रक्रियेत केंद्र सरकारने चीनपुढे माघार घेतल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला घाबरुन भारताची पवित्र जमीन चीनला देऊन टाकली, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या सीमावादावर तोडगा काढत दोन्ही देशांच्या सैन्याने माघारीची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी संसदेत माहिती दिली आहे.
याचाच संदर्भ देत राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला आहे. भारताची जमीन फिंगर ४ पर्यंत होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिंगर ३ ते फिंगर ४ पर्यंतची भारतीय जमीन चीनसाठी सोडून दिली. तसेच डेप्सांग भागात चीनने घुसखोरी केली आहे, त्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी काहीही सांगितले नाही. तसेच गोग्रा आणि हॉटस्प्रिंगमध्ये चीनचे सैन्य घुसलेले असूनही त्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनीही काहीही सांगितलेले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भीत्रे आहेत ते चीन समोर उभे राहायला घाबरतात, भारताचं सैन्य, वायूदल चीनशी लढायला तयार आहे पण पंतप्रधान तयार नाहीत असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.