बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंवर नाराज?

बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. यामुळे येत्या काळात केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.;

Update: 2020-11-26 08:41 GMT

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने ब्रेक लावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाले असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिले आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना जरी राज्य सरकारांनी विरोध केला तरी ते प्रकल्प रद्द केला जाणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रगती मिटिंगमध्ये नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाला महाराष्ट्र सरकार सहकार्य करत नसले तरी गुजरातच्या हद्दीमधील काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले आहे. तसंच महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बांधकाम सुरू होण्याआधीची कामं पूर्ण झालेली नसल्याबाबत नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

आतापर्यंत या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये ८५ टक्के भूसंपादन झाले आहे तर महाराष्ट्रातील केवळ २५ टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. गुजरातमधील ३४९ किलोमीटरच्या मार्गापैकी ३२५ किलोमीटर मार्गाचे कंत्राट देण्यात आले आहे.

Tags:    

Similar News