राम मंदिर कारागीरांचं PM मोदींकडून कौतूक; आनंदोत्सवात केली मजूरांवर पुष्पवृष्टी

Update: 2024-01-22 13:05 GMT


आयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना : आयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने राममुर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला हजारो लोक जमले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आमंञित-निमंञित विशेष अतिथी, साधू-संत आणि मराठी व हिंदी चिञपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शवली. संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असलेल्या जनसमूदायास संबोधित केल्याच्या नंतर पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर बांधकाम करणाऱ्या कारागिरांचं कौतूक करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या बांधकामाचे भूमीपुजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मोदींनी कुबेरटीला याठिकाणी भेट दिली, तिथे भगवान शंकराची पूजा केली आणि शेवटी राम मंदिराच्या कामगारांवर पुष्पवृष्टीचा वर्षाव करत त्यांच्या कार्याचं कौतूक केलं 

Tags:    

Similar News