मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात एका पोलिस निरीक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या पोलीस निरीक्षकाचे नाव भीमराज रोहिदास घाडगे असं आहे. या पोलिस निरिक्षकांचे मते परमबीर सिंग हे भ्रष्ट असून त्यांनी पदाचा वापर करत माझ्यावर (भीमराज घाडगे) अन्याय केला आहे. असा आरोप पोलिस निरिक्षक भीमराव घाडगेंनी केला आहे.
दरम्यान परमबीर सिंह यांनी हे प्रकरण महाराष्ट्राबाहेरील तपास यंत्रणेकडे द्यावे. अशी याचिका कोर्टात दाखल केली आहे. याचिकेविरोधात सरद पोलिस निरिक्षकाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे चौकशी न देता महाराष्ट्राच्या बाहेर ही केस हस्तांतरित करण्याबाबतची याचिका सुद्धा फेटाळायला हवी. अशी मागणी केली आहे.
२७ वर्षे सेवा देणारे पोलीस निरीक्षक म्हणतात की -
ते अनुसूचित जाती (एससी) समुदायाचे असल्याने परमबीर सिंग यांनी त्यांना पदोन्नती आरक्षण नाकारले. तसेच त्यांच्यावर अत्याचार केले. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे बिल्डर्स सोबत संबंध होते. जेव्हा त्यांना माझ्याकडून फायदा झाला नाही, तेव्हा त्यांनी त्यांच्यावर खोटे खटले दाखल केले.
असे आरोप या पोलिस निरिक्षकाने केले आहेत.