नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेकडून खड्ड्याची पूजा

Update: 2021-08-23 08:51 GMT

जळगाव// जळगाव शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन ते थाळनेर दरवाजाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नगरपालिकेच्या दवाखान्याच्या समोर रस्त्याच्या मधोमध गटारीवर मोठ्या प्रमाणावर खड्डा पडलेला आहे. या रस्त्यावरून दररोजचे मोठ्या प्रमाणावर वाहने व नागरिक ये-जा करत असतात. रस्त्याच्या मधोमध हा खड्डा असल्याने वाहनबचालकांना खड्डा चुकवण्यासाठी लहान-मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून हा खड्डा असल्याने नगरपालिकेच्या दवाखान्यात लसीकरणासाठी तसेच इतर उपचारासाठी लहानांपासून वृद्धापर्यंत अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात, हा एकच खड्डा नाही तर शहरात इतर ठिकाणीही बरेच खड्डे पडले आहेत, मात्र याकडे नगरपालिकेने सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचे म्हणत मनसेचे शहराध्यक्ष पुंडलिक महाजन यांनी या खड्ड्याची पूजा करून नगरपालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

या खड्डासह शहरातील इतर खड्डे तातडीने बुजवले जावेत अन्यथा संपूर्ण शहरातील खड्ड्याची पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात तृतीयपंथी यांच्या हातून सत्यनारायणाची पूजा करू असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष पुंडलिक महाजन यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News